गडचिरोलीत नाकाबंदीदरम्यान कारचालकाने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले

GADCHIROLI police

गडचिरोली (वृत्तसंस्था) गडचिरोलीच्या आरमोरी शहराजवळ नाकाबंदीदरम्यान कारचालकाने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले आहे. या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल केवलराम येलुरे (वय 40) यांचा मृत्यू झाला आहे.

 

गडचिरोलीत लोकसभा निवडणूक आणि नियमित नाकाबंदी सुरु होती. रात्री साधारण दीड वाजेच्या सुमारास एक स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने येत होती. पोलीस कर्मचारी केवलराम येलुरे यांनी गाडी चालकाला लाईट दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा दिला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत चालकाने गाडी थेट येलुरे यांच्या अंगावर घातली. या घटनेत येलुरे यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपी मद्यप्राशन करुन गाडी चालवत होते का? की हा एक अपघात होता? तसेच दारुतस्करीत करीत होते का?, या अनुषंगाने देखील तपास पोलीस करत आहेत.

Add Comment

Protected Content