तडीपारचे आदेश मोडल्याने रावेर शहरातील पाच जणांविरुध्द गुन्हा

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तडीपारचे आदेश मोडून गणेश विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाल्याबद्दल रावेर शहरातील पाच जणांविरुध्द पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत वृत्त असे की, “रावेर शहरात गणेश विसर्जन मिरवणूकीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरातील ६३ जणांना दि ८ व दि ९ दोन दिवस तडीपार करण्यात आले होते.

यापैकी हर्षल बेलसकर, प्रफुल्ल महाजन, आकाश बिल, पंकज महाजन, विनोद सातव हे गणेश विसर्जन मिरवणुकीत आढळुन आल्याने पोलीस निरीक्षक कैलास नागरे सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनावरुन शासकीय आदेशाचे उलंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Protected Content