शेतातील कांदा रोपावर तणनाशक फवारणी करून शेतकऱ्याचे नुकसान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेताताील कांद्याचे रोपांवर तणनाशक फवारणी करून मोठे नुकसान केल्याचे समोर आले आहे. यात शेतकऱ्याचे ३० हजार रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत दहिगाव पिक संस्थेने नुकसानीचा पंचनामा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहिगाव येथील युवराज चौधरी यांनी छगन पवार यांचे दहिगाव शिवारातील शेत गट नंबर ३७७ एक दोन मधील १४ वाफे कांद्याचे रोप लागवड केली होती. या रोपावर कुणीतरी अज्ञात इसमाने तणनाशक फवारणी केल्याने हे रोप पुर्णपणे जळून खाक झाली आहे. याच बरोबर कांदा रोपाच्या बाजूला असलेले मुगाच्या पिकावरही फवारणी केल्याने मुंगपीक ही जळून खाक झाले आहे. या बाबतचा पंचनामा युवराज चौधरी यांनी पीक संस्थेला माहिती दिल्यावरून संस्थेचे चेअरमन रमेश पाटील व सचिव नरेंद्र पाटील यांनी शेतात घटनास्थळी भेट देऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामा केला आहे.             या बाबत अज्ञात इसमाविरुद्ध यावल पोलिसात तक्रार दाखल करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना या शिवारात व परिसरात अनेक वेळा घडल्या आहेत.

Protected Content