खंडेराव नगरातून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, खंडेराव नगरातील आशाबाबा कॉलनीत १७ वर्षीय मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. वडील मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. ८ एप्रिल रोजी अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. दरम्यान परिसर आणि नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता अल्पवयीन मुलगीचा शोध लागला नाही. याप्रकरणी अल्पवयीन मुलीची आई यांनी रामानंद नगर पोलीसात अज्ञात व्यक्ती विरूध्द फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. आईच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिपक बिरारी करीत आहे. 

Protected Content