अल्पवयीन मुलीला रिक्षा बसवून पळविले; तरूणावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातील तरूणाने रिक्षात बसवून फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली. एमआयडीसी पोलीसात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडीलांसह राहते. वडील हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. गावातील मरीमाय मंदीर जवळील रिक्षा स्थानक येथून गावातील राहिल जावेद रा. म्हसावद ता.जि.जळगाव या तरूणाने अल्पवयीन मुलीला रिक्षात बसवून फूस लावून पळवून नेल्याची घटना ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता घडली रिक्षा ही एरंडोल रोडकडून पसार झाले होते. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली आहे. वडीलांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे. 

 

Protected Content