जामनेरात राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटील यांचा निषेध

जामनेर प्रतिनिधी । राज्यमंत्री छगन भुजबळ यांना उद्देशून अपमानजनक शब्द वापरल्याच्या निषेधार्थ शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नगरपालिका परिसरात  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

नगरपालिका परिसरात राजमाता जिजाऊ चौकात दहन करून निषेधार्थ घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे संजय गरूड, राजेंद्र चौधरी, किशोर पाटील, संदिप हिवाळे, प्रल्हाद बोरसे, डॉ.प्रशांत पाटील, जितेश पाटील, राजु नाईक, प्रभु झाल्टे, दिपक रिछवाल यांच्यासह आदी उपस्थित होते. 

Protected Content