Home Cities जळगाव रामेश्वर कॉलनीत बंद घर फोडले; ६५ हजाराची रोकड लांबविली

रामेश्वर कॉलनीत बंद घर फोडले; ६५ हजाराची रोकड लांबविली


जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीतील एकनाथ नगर येथील मजूराचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून कपाटातील ६५ हजाराची रोकड लांबविल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, सिताराम देला राठोड (वय-४२) रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी परिसर हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ते नातेवाईकांकडे कामाच्या निमित्ताने घराला कुलुप लावून गेले होते. दुसऱ्या दिवशी गुरूवारी ६ मे रोजी सकाळी ८ वाजता घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेला दिसून आला. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद घर फोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ६५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याचे दिसून आले. सिताराम राठोड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे. 

 


Protected Content

Play sound