पावसाळ्यापूर्वी खड्डेमय रस्ते दुरूस्त करा : यावलकारांची मागणी

 

यावल  प्रतिनिधी  ।  येथे नगर परिषदतर्फे विस्तारित वसाहतीत जलवाहिनीच्या जोडणीसाठी डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्यावरील खोदलेले खड्डे  दुरुस्त न केल्यास येथील रहिवाशांना पावसाळ्यात रहदारी करणे अवघड होणार असल्याने हे नगर परिषदेने वेळेपुर्वीच ही सर्व रस्ते दुरूस्त करावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

मागील तिन महीन्यांच्या कालावधीत यावल नगर परिषदच्या शहरातील विस्तारीत क्षेत्रातील सुमारे २७ ते २८ कॉलन्यांमध्ये पाच कोटी७५ लाख रुपयांच्या वैशिष्टपुर्ण निधीतुन नागरीकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या उद्देशाने युद्धपातळीवर वेगाने जलकुंभ आणि  जलवाहिनी पाईपलाईनचे टाकण्यात आली असुन , सदरची पाईपलाईन टाकण्याकरिता साधारण दोन वर्षापुर्वी केलेल्या डांबरीकरण रस्त्यास खोदण्यात आल्याने पुनश्च या संपुर्ण वसाहती मधील चांगल्या स्थितीत असलेले संपुर्ण रस्ते हे खड्डेमय झाले आहेत.  पुढील महीन्यात येवु घातलेल्या पावसाळया या वसाहती मधील रहीवासी नागरीकांना या रस्त्यांवरुन रहदारी करतांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार हे आता निश्चीत झाले आहे .

विस्तारीत वसाहतीमधील फालक नगर , गंगानगर, पांडुरंग सराफ नगर , तिरुपती नगर, पुष्पतारा नगर, भास्कर नगर , आयशानगर , चांद नगर, हरीओम नगर , गणपती नगर आदी परिसरातुन जलवाहीनी पाईपलाईनसाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहेत.  येणाऱ्या पावसाळ्यात  याचा मोठा त्रास व प्रसंगी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी नगर परिषदने वेळेपुर्वीच समय सुचकता बाळगुण तात्काळ रस्ते दुरूस्तीचे कामे करावी तरच हे पावसाळ्यातील येणारे नागरीसंकट टाळता येईल . यासाठी मुख्यधीकारी व नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी तात्काळ या संकटावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरीक करीत आहेत.

 

Protected Content