कॉंग्रेसतर्फे मोदी सरकारचा जाहीर निषेध (व्हिडिओ )

जळगाव,प्रतिनिधी । मोदी सरकारला अपयशाचे सात वर्षे पूर्ण झाले याच सात वर्षात मोदी सरकारने देशाला ज्या डबघाईत टाकले त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.   या  पार्श्‍वभूमीवर जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी व एनएसयुआयतर्फे  केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध जिल्हा कॉंग्रेस भवन येथे करण्यात आला. 

 

कोविड साथ रोगाच्या नियंत्रणात गाफीलपणा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात अपयश लसी करण्यात आलेले अपयश. पेट्रोलचे डिझेलचे भाव आणि वाढती महागाई,  देशाची ढासळती अर्थव्यवस्था नोटबंदी आणि जीएसटीमुळे झालेले देशाची दुर्दशा, या सात वर्षात  १२  कोटी लोक बेरोजगार झाले, त्यांनी  नोकरी गमावली,  शेतकरी विरोधी कायदे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नामुष्की, मोदींच्या दोन उद्योगपती मित्रांसाठी देश विकायला काढला असल्याचा आरोप करण्यात आला.  रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, पेट्रोलियम कंपन्या अशा सरकारी अस्थापना विकायला काढल्या आहेत. या संपूर्ण संपूर्ण गोष्टीचा जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी व एनएसयुआयतर्फे मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज दिगंबर चौधरी अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष मनोज कुमार सोनवणे जळगाव जिल्हा जनरल सेक्रेटरी जमील शेख प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर, कोळी, एनएसयआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, सोशल मीडिया प्रमुख प्रमोद घुगे, भिकन सोनवणे, समाधान पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे महानगराध्यक्ष अमजद पठाण, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, दीपक सोनवणे,  पी. जी. पाटील, गोकुळ चव्हाण, राहुल गरुड, वैभव पाटील, सचिन माळी, ज्ञानेश्वर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/207926904509895

 

Protected Content