महाविकास आघाडीचा पॅटर्न राष्ट्रीय स्तरावर ! : राऊत

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रातील महाविकास आघाडीप्रमाणेच राष्ट्रीय पातळीवर देखील महाआघाडी आकारास येणार असल्याची माहिती आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यांशी बोलतांना दिली आहे.

जसं महाराष्ट्रात तीन पक्षांनी उद्धव ठाकरे यांना नेता केलं आणि सरकार उत्तम चाललंय. महाविकास आघाडी ही देशातील एक आदर्श आघाडी आहे. तीन भिन्न विचाराचे पक्ष एकत्र आले. त्याचं नेतृत्व आज उद्धव ठाकरे करत आहेत. ही एक आदर्श अशी व्यवस्था आहे. आपण ते निर्माण केलंय. राष्ट्रीय स्तरावर देखील अशी नवनवीन व्यवस्था निर्माण करावी. सगळ्यांनी एकत्र यावं, अशा प्रकारचं मत मी व्यक्त केलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, “कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्रातील स्थिती आता सर्वात चांगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी चांगलं काम करत आहे. इतर राज्यांत ही स्थिती दिसत नाही. इतर राज्यात पाहिले तर स्मशानभूमीसमोर प्रेतांच्या रांगा लागल्याचं दिसतंय.”

देवंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. आरोप करणे त्यांचं काम आहे. राज्य सरकारचे कार्य चांगले नसल्याचा त्यांनी आरोप केला होता. पण त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल उत्तर दिलं आहे. कोरोना काळात महाराष्ट्राने चांगलं काम केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.”

Protected Content