कुंभमेळ्यातील गर्दीवरच्या टीकेवर आता बाबा रामदेवही चिडले

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कुंभमेळा आणि हिंदुत्वाचा टूलकिटच्या माध्यमातून अपमान करणं हा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कट असून तो  अपराध आहे. माझी अशा लोकांना विनंती आहे की ते राजकारण करू शकतात, पण हिंदूंचा अपमान करू नका.  देश तुम्हाला माफ करणार नाही.  लोकांनी अशा शक्तींवर बहिष्कार टाकावा असं   रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे 

 

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर देशात सध्या असलेल्या कोरोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट काँग्रेसच्या नावाने व्हायरल होत आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी हे टूलकिट ट्विटरवरून शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता योगगुरू रामदेवबाबा यांनी देखील टूलकिट प्रकरणावरून काँग्रेसचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. . काँग्रेसकडून हे ट्वीट बनावट असून त्यासंदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, भाजपाकडून काँग्रेसवर सातत्याने यासंदर्भात टीका करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता रामदेव बाबा यांनी देखील निशाणा साधला आहे.

 

सर्वात आधी भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी हे कथित टूलकिट शेअर करत आरोप केले. त्यावर   प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर देत टूलकिट बनावट असल्याची बाजू मांडली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले. राज्यात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी हे टूलकिट शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला. त्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अतुल भातखळकर यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत त्यांच्या ट्वीटचा समाचार घेतला.

रात्री उशिरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेस पक्षाला लक्ष्य करत “नेहमीच भारतविरोधी भूमिका का?” असा सवाल केला.त्यामुळे या टूलकिट प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे.

 

Protected Content