सनी देओलकडून लोकसभा निवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिकचा खर्च

sunny deol 1558254425

 

चंडीगढ (वृत्तसंस्था) पंजाबमधील गुरदासपुरचे खासदार सनी देओल यांनी लोकसभा निवडणुकीत निर्धारित ७० लाख रुपयापेक्षा अधिकची रक्कम खर्च केली आहे. याबाबत नुकतीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

 

‘द वायर’ या संदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने म्हटले की, गुरुदासपूरच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी भारतीय निवडणूक आयोगाला खर्चाशी संबंधित आपली अंतिम आकडेवारी पाठवली आहे. या आकडेवारी नुसार सनी देओलचा खर्च ७८,५१,५९२ एवढा आढळून आला आहे. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी निर्धारित ७० लाखापेक्षा सनी देओलने ८.५१ लाख रुपये जास्तीचे खर्च केल्याचे समोर आले आहे. तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील जाखडने यांनी निर्धारित रकमेच्या आताच म्हणजे ६१,३६,०५८ एवढे रुपये खर्च केले आहे. निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याद्वारा सादर केलेल्या खर्चाच्या अहवालाला खा.देओल हे आव्हान देऊ शकतात. तर देओल हे एकमात्र , असे उमेदवार आहेत. ज्यांना खर्च मर्यादेपेक्षा अधिक आढळून आहे. गुरुदासपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी सह-उपायुक्त विपुल उज्ज्वल यांनी मागील महिन्यातच खा.देओल यांना नोटीस पाठवीत निवडणूक खर्चावर आपले म्हणणे मागविले होते.

Protected Content