‘पंतप्रधान पथाविक्रेता आत्मनिर्भर निधी’चे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मंजूर करा

 

जळगाव, प्रतिनिधी । महापालिका अंतर्गत केंद शासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथाविक्रेता आत्मनिर्भर निधी’ पथाविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म-पतपुरवठाच्या सुविधा योजना शहरात अंमलबजावणीकरिता महापालिकेत या योजनेबाबत सर्व बँक व्यवस्थापकांची आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आढावा बैठक घेऊन प्रलंबित प्रस्ताव १० डिसेंबरपर्यंत मंजूर करण्यात यावेत अशी सूचना केली.

आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी ‘पंतप्रधान पथाविक्रेता आत्मनिर्भर निधी’ वितरणाबाबत शहरातील बँक व्यवस्थापकांची नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीत असे आढळून आले की, बरेचसे लाभार्थ्यांचे पीएम स्वनिधी कर्ज प्रस्ताव बँकांमध्ये प्रलंबित आहे. यावेळी आयुक्त श्री. कुलकर्णी यांनी यांनी सर्व बँकांकडील प्रलंबित पीएम स्वनिधी कर्ज प्रस्ताव १० डिसेंबर तत्काळ मंजूर करून वितरीत करावे अशा सूचना दिल्यात. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अरुण प्रकाश, बँक ऑफ इंडीया, युको बँक, भारतीय स्टेट बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, इंडियन बँक, व एनयुएलएम विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक शालिग्राम लहासे व गायत्री पाटील तसेच सर्व समुदाय संघटक हजर होते.

Protected Content