Home आरोग्य भारतरत्न डॉ. आंबेडकरांना डॉ. उल्हास पाटील कॉलेजकडून आदरांजली

भारतरत्न डॉ. आंबेडकरांना डॉ. उल्हास पाटील कॉलेजकडून आदरांजली

0
105

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महामानवाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. पंकज शर्मा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्राचार्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे आणि कार्याचे महत्त्व विषद करत त्यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे स्मरण केले.

या कार्यक्रमाला डॉ. विपुल, डॉ. वसिक, डॉ. स्नेहा, डॉ. प्रतीक पाटील, डॉ. आदित्य पाटील, डॉ. भूषण, डॉ. गणेश महाजन, डॉ. समता यांच्यासह रजिस्ट्रार डॉ. ललित महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा जयंती सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Protected Content

Play sound