रेल्वेतून पडलेल्या ‘त्या’ परप्रांतीय व्यक्तीची ओळख पटली !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते तरसोद रेल्वेरूळ दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने एका ५८ वर्षीय परप्रांतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २२ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली होती. सुरूवातीला अनोखळी म्हणून नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आधारकार्ड मदतीने मयताची ओळख पटली. रविवारी २४ मार्च रोजी शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रज्जन छदीलाला वर्मा वय ५८ रा. नौवरस्ता, बाबानगर, जि.कानपूर उत्तर प्रदेश असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रज्जन छदीलाल वर्मा हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. शिलाईचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. कामाच्या निमित्ताने मुंबई येथे १ मार्च रोजी गेले होते. त्यांचे काम आटोपून घरी जाण्यासाठी ते मुंबई ते कानपूर रेल्वेने २२ मार्च रोजी प्रवास करत होते. जळगाव ते शिरसोली रेल्वे लाईनदरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक रेल्वे खंबा क्रमांक ४२७ च्या ११ आणि १३ च्या दरम्यान धावत्या रेल्वेतून पडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. सुरूवातील अनोळखी म्हणून नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, अधार कार्डच्या मदतीने मयताची ओळख पटली. नातेवाईकांनी रविवार २४ मार्च रोजी दुपारी २ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Protected Content