वैशाली हिंगे यांची मॅटमध्ये धाव: बदलीला आव्हान

जळगाव प्रतिनिधी । अलीकडेच जळगावच्या तहसीलदार पदावरून नंदुरबार येथील सरदार प्रकल्पामध्ये उपसचिव या पदावर बदली करण्यात आलेल्या वैशाली हिंगे यांनी आता या बदलीच्या विरोधात मॅटमध्ये धाव घेतली असून बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.

जळगावच्या तत्कालिन तहसीलदार वैशाली हिंगे यांची अलीकडेच सरदार सरोवर प्रकल्पात उपसचिव या पदावर बदली करण्यात आलेली आहे. या संदर्भातील आदेश प्रशासकीय पातळीवरून देण्यात आले असून त्यांना बदली झालेल्या ठिकाणी रुजू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दरम्यान या बदलीच्या विरोधात वैशाली हिंगे यांनी आता मॅट कडे धाव घेतलेली आहे. विहित नियमानुसार आपण 2022 पर्यंत जळगाव येथे सेवा करू शकतो. असे असताना देखील आपली जाणीवपूर्वक बदली करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. या प्रकरणी दोन नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे वैशाली हिंगे यांनी याआधी सुद्धा एकदा मॅट मधून आपली बदली रद्द करून आणली होती. यामुळे आता मॅट काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content