Home Cities जळगाव जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात १९ जून रोजी जिल्हा पेंशन/पी.एफ. कार्यशाळा 

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात १९ जून रोजी जिल्हा पेंशन/पी.एफ. कार्यशाळा 

0
14


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हा पेंशन/पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता होणार असून, निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्या आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या कार्यशाळेमध्ये महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्क), महाराष्ट्र-१, मुंबई येथील चार अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) तसेच संबंधित विषयांवरील अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवृत्तीवेतनाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, तांत्रिक अडचणी किंवा इतर समस्या यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यावर मार्गदर्शन व समाधान मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या निवृत्तीवेतन सेवा व सुविधांबाबत योग्य माहिती मिळावी तसेच प्रशासनाशी थेट संवाद साधता यावा, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपल्या परिचयातील इतर निवृत्तीवेतनधारकांनाही या कार्यशाळेची माहिती देऊन त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी केले आहे.


Protected Content

Play sound