भोंगऱ्या बाजार उत्सवात रंगले यावलकर डॉ. कुंदन फेगडे.

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गारखेडा येथे पारंपारिक पध्दतीने होळीच्या पार्श्वभुमीवर आदिवासी समाज बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे वर्षातील सर्वात मोठा सण भोंगऱ्या बाजार हा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
या उत्सवात यावल येथील सामाजीक कार्यकर्ते व आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष व युवकांचे नेतृत्व करणारे डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांनी भोगऱ्या उत्सवात सहभागी होत आदिवासी बांधवांना भोंगऱ्या उत्सव सणाच्या शुभेच्छा दिल्या.
आदिवासी पारंपारीक वाद्य वाजवत आदिवासी बांधवांसोबत रंगले आदिवासी बांधवांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे असे आकर्षक वस्त्र परिधान करून विविध आदिवासी लोकगीतांच्या संगीतावर नृत्य सादर केले. यावेळी डॉ.कुंदन फेगडेंसह भाजपाचे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोमती बारेला, ग्रामपंचायत सदस्य महेश बारेला, रामलाल बारेला, दिनेश चव्हाण, गाठू बारेला, रमेश बारेलासह आदींची या उत्सवात उपस्थिती होती.

Protected Content