फैजपूर शहरासह परिसरात अवैध धंदे सुरू; कारवाईची मागणी

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । गेल्या दीड महिन्यांपासून शहरासह परिसरात अवैध धंदे बंद करण्यात आले होते. परंतू आता पुन्हा दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर अवैध धंदे जोमात सुरू आहेत. पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

कोरोना काळात आधीच नागरीकांना हाताला काम नाही, अशा कठीण परिस्थीतीत पुन्हा अवैध धंदे सुरू झाले आहे. फैजपूर शहरासह न्हावी, आमोदा, बामणोद, पडळासा, भालोद यासह परिसरात अवैध धंदे सट्टा पुन्हा जोमाने सुरू झाले आहे. लॉकडाऊन परिस्थिती असतांना शहरात अवैध धंदे सुरू करण्याची अधिकृत परवानगी दिली कोणी? यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे काय? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दीड महिना सट्टा बंद होते, यामुळे कुणाचे आर्थिक नुकसान झाले असा कुठलाही प्रकार झाला नाही, मग आताच सट्टा सुरू करण्याचे प्रयोजन कुणाचे होते? लॉकडाउन परिस्थितीत अनेकांचे संसार कोलमडले त्यातच सट्टा सुरू झाल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होण्याची चिन्हे आहे. लॉकडाऊन असतांना अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहे. स्थानिक पोलीसांनी शहरातील अवैध धंदे पुन्हा बंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातून होत आहे.

 

Protected Content