Home क्राईम पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल


पुणे (वृत्तसंस्था) जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असून पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जातोय. त्यातच प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलेलं असताना पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात हा संताप आणखी वाढवणारी एक घटना समोर आली आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याने शिवाजी चौकात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. यानंतर व्यवसायाने टी.सी. असलेल्या या व्यक्तीला पकडून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय त्याचे नोकरीतून तातडीने निलंबनही करण्यात आले आहे.


उपेंद्रकुमार श्रीवीर बहादूरसिंग असे या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो मूळचा बिहारचा रहिवासी असून लोणावळा रेल्वे स्थानकात कामाला होता. देशविरोधी घोषणा देणाऱ्या या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षियांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली आहे. पोलिसांनी कठोर कारवाईचे आश्वासन देत जमावाला शांत केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound