रस्ता दुरुस्ती करण्याची राष्ट्रवादी पक्षांकडून निवेदनाद्वारे मागणी

यावल ,प्रतिनीधी | यावल – चोपडा दरम्यानच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे ती तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बुऱ्हाणपूर ते अंकलेश्वर या राज्य मार्गावरील यावल ते चोपडा या दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे अनेकांना मनक्याचा आजार जडला आहे. हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्तीची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात यावल विरावली ते दहिगाव दरम्यानच्या रस्त्याची देखील मागील दोन वर्षापासुन दयनीय अवस्था झाली आहे. वाहन धारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती या रस्त्यावर निर्माण झाली आहे. यामुळे तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बांधकाम विभागावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासंदर्भातील माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री ना . नितिन गडकरी. अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री ( महाराष्ट्र राज्य ), रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे ,मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्या कडे प्रत दिली आहे.

निवेदनावर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष देवकांत पाटील, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष नरेंद्र शिंदे, तालुका संघटक राहुल चौधरी , तालुका सरचिटणीस रोहन महाजन , संघटक अक्षय बोरोले, विरावली शाखा अध्यक्ष गिरीष पाटील, तालुका समनव्यक किशोर माळी ,उपाध्यक्ष पवन पाटील व बादशा पाटील आदी उपस्थिती होते.

Protected Content