कोरोना : जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही

जळगाव प्रतिनिधी ।  जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आला नसल्याचे तर १ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जिल्ह्यात आज दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळून आला नाही. तर भुसावळ तालुक्यातील १ बाधित रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७८५ रूग्ण आढळून आला आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content