‘या’ केंद्रशासित प्रदेशात भाजपने दिला अजित पवार गटाला पाठिंबा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये भाजप लोकसभा निवडणूकीसाठी आपला उमेदवार देणार नाही. भाजपने ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडली आहे. महाराष्ट्र राज्याबाहेर ही राष्ट्रवादीची एकमेव जागा आहे. लक्षद्वीपमध्ये लोकसभेसाठी एकच मतदारसंघ आहे.

राष्ट्रवादीने महायुतीत आठ ते नऊ जागांचा आग्रह धरला आहे. पण भाजप पाचपेक्षा जास्त जागा सोडण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्याबाहेर एक जागा राष्ट्रवादीला सोडून अजित पवार गटाला तेवढाच दिलासा दिला आहे. लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीचे मोहम्मद फैझल हे खासदार आहेत. मुस्लीमबहुल लक्षद्वीपमध्ये भाजपची फारशी ताकद नाही. यामुळेच पक्षाने उमेदवार उभा करण्याचे टाळले असावे. यापेक्षा मित्र पक्षाला पाठिंबा दिला आहे.

Protected Content