केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेर्धात इंडिया आघाडीची ३१ मार्च रोजी होणार महारॅली

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभेच्या निवडणूकीची रणधूमाळी सुरू झाली आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष एकजूट झाले आहे. या अटकेचा निषेध करण्यासाठी रविवार ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता इंडिया आघाडीच्या पक्षांनी दिल्लीतील रामलीला मैदानात महारॅलीचे आयोजन केले आहे. ही माहिती दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या वतीने २४ मार्च रोजी आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी दिल्लीचे मंत्री गोपाल राय, दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अरविंदर सिंह लवली उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश जस्टिस मनमोहन यांच्या कोर्टाने केजरीवाल यांच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार दिला. ईडीच्या रिमांड विरोधात त्यांनी शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी तातडीची सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती.

 

Protected Content