धनगर समाज यशवंत सेनेतून राज्यातील १५ जागांवर उमेदवार देणार

अहिल्यादेवी नगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारने धनगर समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावर फसवले आहे. अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा प्रश्न हा मार्गी लागत नाही आहे. सर्व सरकारांनी समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी धनगर समाज यशवंत सेनेच्या वतीने राज्यातील १५ जागांवर उमेदवार देणार आहे. अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेबत दोडतले यांनी दिली.  अहमदनगरमधील चौंडी येथे धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक घेण्यात आली. या बैठकीत लोकसभा निवडणूकीच्या संदर्भातील मोठे निर्णय घेण्यात आले आहे.

अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेब दौडतले यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी दौलतडे म्हणाले की, आजपर्यंत सत्तेत आलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाविषयी वेळोवेळी फसवणूक केली. तसेच राज्यातील कोणत्याच पक्षाने धनगर समाजातील उमेदवारांना लोकसभेबाबत विचारात घेतले नाही. अथवा त्यांना उमेदवारीही जाहीर केली नाही. ज्या ज्या ठिकाणी धनगर समाज निर्णायक भूमिका घेऊ शकतो, त्या ठिकाणीही कोणत्याही राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्याने अखेर धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ही लढाई लढणार आहोत, राज्यात अनेक ठिकाणी मेळावे घेऊन उमेदवारी जाहीर करणार आहे.

Protected Content