काँग्रेस आमदाराच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक-पुणे मार्गावरील वेल्हे ते पिंपळनेर भिवंडी हद्दीतील काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक घटना समोर आले आहे. ते मुंबईहून जालन्याकडे चालले होते.

 

राजेश राठोड यांनी व्हिडीओ प्रसारित करुन ही माहिती दिली. राजपूत भामटा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण राजेश राठोड यांनी लावून धरले होते. राजेश राठोड यांना करणी सेनेकडून काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. “मुंबई येथून नाशिकमार्गे औरंगाबाद-जालना प्रवासाला सुरुवात केली. वेल्हे ते पिंपळनेर दरमयान ट्रॅफीक जाम असतं. वाहनामध्ये असताना, एका मोठा टँकर ट्रक त्याचा नंबर संबंधित पोलिसांना देणार आहे. अचानक भरधाव ट्रक माझ्या गाडीवर चालून आला. पाच ते सहा मिनिटाचा पाठलाग करुन गाडी आडवी लावून उभी केली. तेव्हा समजलं की, तो साधा प्रवास करणारा ट्रक नव्हता. त्याच्या बोलण्यातून शंका आली. गेल्या काही दिवसापासून धमक्या येत आहेत. मला घातपाताची शक्यता वाटत असल्याचे आमदार राजेश राठोड यांनी सांगितले.

Protected Content