पत्रकारावर हल्ला; सावदा येथील ताप्ती जर्नालिस्ट सावदा पत्रकार संघाचे निवेदन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना काही गावगुंडाकडून भररस्त्यावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली होती. पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ताप्ती जर्नालिस्ट सावदा पत्रकार संघाने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोर्‍या चे आमदार किशोर पाटील यांनी अर्वाच्या भाषेत अश्विन शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्यानंतर पत्रकार संदीप महाजन यांना गुरूवारी १० ऑगस्ट रोजी दुपारी काही गुंड लोकांनी तोंडावरती रुमाल टाकून गाडी थांबवून हल्ला करून बेदम मारहाण केली पत्रकार संदीप महाजन यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला देऊन संबंधित गावगुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार संघाने आज सावदा येथे सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पडे यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी पत्रकारांकडून करण्यात आली.

 

निवेदन देते वेळी संस्थेचे अध्यक्ष श्यामकांत पाटील, आत्माराम तायडे, राजेंद्र भारंबे, प्रवीण पाटील, पंकज पाटील, कमलाकर पाटील, रवींद्र हिवरकर,साजिद शेख, मिलिंद टोके, जितेंद्र कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी, राज चौधरी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

Protected Content