वीज ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर -ऊर्जामंत्र्यांची घोषणा

बुलढाणा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | थकीत वीजबिल आणि कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी “विलासराव देशमुख अभय योजना” लोणार येथे पत्रकार परिषदेत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी योजना जाहीर केली. ही योजना १ मार्च २०२२ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू असेल.

विलासराव देशमुख अभय योजना या योजनेमुळे राज्यातील बंद पडलेले कृषी, औद्योगिक आणि घरगुती जोडण्या पुन्हा सुरू होऊन राज्यातील कायमस्वरूपी बंद पडलेले उद्योग, कृषी कनेक्शन सुरू होतील. राज्यात रोजगार निर्माण होऊन राज्याच अर्थचक्र सुरळीत होण्यास मदत होईल. राज्यात जवळपास ३ लाख १६ हजार ५०० ग्राहकांच्या वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद केलेला आहे. अशा ग्राहकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे उर्जामंत्र्यांनी सांगितलं. राज्यात ९३५४ कोटी रुपये थकबाकी असून यामुळे राज्याच्या वीज मंडळाचे अर्थचक्र थांबलं असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं. राज्यात आमच्या सरकारच्या काळात १७ हजार कोटी असलेली थकबाकी भाजपाच्या काळात ५१ हजार कोटीपर्यंत गेली आणि ती आता ७१ हजार कोटी झाली आहे. कोरोना काळात महावितरणच्या शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना आज श्रद्धांजली अर्पण करतो, असं नितीन राऊत म्हणाले. कोरोना काळात केंद्र सरकारने एक रुपयाही दिला नाही. उलट जादा व्याजदर आकारुन मदत देऊ केली असता आम्ही नाकारून खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन राज्याचा गाडा चालविला. कोरोना काळात आम्ही राज्य अंधारात जाऊ दिले नाही. विलासराव देशमुख अभय योजनेत एकरकमी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना १०० टक्के व्याज माफी आहे, याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असंही त्यांनी सांगतिलं

Protected Content