भुसावळकर वाढत्या उन्हाने त्रस्त (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 04 27 at 5.55.31 PM

भुसावळ (प्रतिनिधी)  शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस तापमनामध्ये कमालीची वाढ होत आहे.  भुसावळ शहराची ओळख हॉट सिटी म्हणून प्रसिद्ध आहे.  भुसावळ शहराचे तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचले असून नागरिक उन्हा पासून बचाव करण्यासाठी सुती कपडे, गोगल्स , रुमाल, टोप्या यांचा वापर करतांना  दिसत आहेत. दुपारी रस्ते निर्मनुष्य होत असून अत्यावश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडत आहेत.

 

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामुळे भुसावळ शहराचे तापमान दरवर्षी उच्चांकी असते.  यंदाही चैत्र महिन्यापासून तापमानाने ४४  अंशाचा पारा ओलांडला आहे .  उष्ण तापमानामुळे शहरातील गजबजलेले रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे.  दुपारी एकवाजे नंतर रस्त्यावर शुकशुकाट असल्याचे जाणवत आहे.  सुज्ञ नागरिक अति महत्त्वाची कामे असल्यावरच घराच्या बाहेर पडताना दिसत आहे.  पेट्रोल पंपावर देखिल वहानधारकनची गर्दी कमी आहे.  संध्याकाळी ६  नंतरच नागरिक घरा बाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे.  उष्ण तापमानामुळे दिलासा मिळविण्यासाठी नागरिक थंड प्यायला आस्वाद घेत आहे.  शहरातील रसवंती कोल्ड ड्रिंक याठिकाणी नागरिकांची गर्दी दिसत आहे.  नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठिकठिकाणी समाज सेविकांनी पिण्याची पाण्याची सोय केली आहे.

Add Comment

Protected Content