तर मोदी सरकार त्यांना देखील दहशदवादी ठरवेल — राहुल गांधी

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन शेतकरी विरोधी कायदे तातडीने मागे घ्यावेत अशा आशयाचे निवेदन दिलं.

राहुल गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना दहशतवादी ठरवलं जात असल्याचे म्हटले आहे. तसेच उद्या सरसंघचालक मोहन भागवत हे जरी या कायद्यांच्या विरोधात बोलले तर त्यांनाही मोदी सरकार दहशतवादी ठरवेल असे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना खालिस्तानी ठरवलं जात आहे. या देशातला शेतकी वर्ग, मजूर वर्गाला सरकारची भूमिका आता कळाली आहे. मोदी सरकार हे गरिबांसाठी नाही तर फक्त काही मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावून हे कायदे रद्द करावे. जोपर्यंत हे कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत शेतकरी आंदोलन थांबविणार नाहीत असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. हा कायदा शेतकरी विरोधी असून सर्व देश या कायद्याच्या विरोधात उभा राहिला आहे असंही ते म्हणाले.

Protected Content