सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सलग दहाव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. आज (मंगळवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ४७ पैशांची तर डिझेलच्या दरात ५७ पैशांती वाढ करण्यात आली.

 

आज दरवाढ झाल्यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.७३ रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ७५.१९ रूपये प्रति लीटर इतके झाले आहेत. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८३.६२ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर ७३.७५ रूपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८०.३७ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर७३.१७ रूपये प्रति लीटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ७८.५५ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर ७०.८४ रूपये प्रति लीटर झाले आहेत. दरम्यान, गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी 7 जूनपासून सुरु झालेली इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये. पेट्रोल आजच्या दिवसात प्रतिलिटर 47 पैसे, तर डिझेल 57 पैशांनी महाग झाले आहे. गेल्या दहा दिवसात पेट्रोल एकूण 4 रुपये 50 पैशांनी, तर डिझेल एकूण 5 रुपये 66 पैशांनी महागले आहे.

Protected Content