भाजपची लोकसभेच्या उमेदवारांची तीसरी यादी जाहीर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा‍| आगामी लोकसभेच्या निवडणूकीसाठी प्रत्येक राजकीय जोरदार तयारी करत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवार ठराविक कालावधीत जाहीर करत आहे. भाजपने आतापर्यंत लोकसभेच्या उमेदवारीच्या दोन यादया जाहीर केल्या होत्या. आज २१ मार्च गुरूवार रोजी भाजपची तिसरी यादी जाहीर केली होती.

या यादीमध्ये तामिळनाडूतील ९ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. या यादीमध्ये दक्षिण चेन्नईमधून तमिलिसाई सुंदरराजन, सेंट्रल चेन्नईमधून विनोज पी सेल्वम, वैल्लोरमधून एसी शणमुगम, कृष्णागिरीमधून सी नरसिम्हा, नीलगिरीमधून एल मुरुगन, कोयंबतूरमधून के. अन्नामलाई, पेरंबलूरमधून टीआर पारिवेंधर, थूथुकुडीमधून नयनार नागेंद्रन, कन्याकुमारीमधून पी राधाकृष्णन यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण ३९ जागा आहेत. या राज्यात भाजपने पीएमके या स्थानिक पक्षासोबत युती केली आहे, त्या पक्षाला भाजपने १० जागा दिल्या आहेत. आतापर्यत भाजपने लोकसभेसाठी २७६ मतदारसंघातून आपले उमेदवार जाहीर केले आहे.

Protected Content