जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सदस्यपदी माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील व आमदार शिरीष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीतर्फे स्विकृत सदस्यांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. या यादीत जळगाव जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील कॉंग्रेस कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. स्विकृत सदस्यपदी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांची निवड करण्यात आली आहे.
अखील भारतीय कॉंग्रेस समितीच्या स्वीकृत सदस्यपदांच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवर नेत्यांची मानाच्या स्थानावर नियुक्ती झाली आहे. याबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.