गाळे धारकांचा प्रश्न नगरविकास मंत्र्यांकडे बैठक घेवून निकाली काढणार- पालकमंत्री

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गाळे धारकांचा प्रश्‍न नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पंधरा दिवसात बैठक घेवून निकाली काढण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा समितीच्या बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची बैठक झाली. त्यात ते बोलत होते. नगरसेवक व नियोजन समितीचे सदस्य नितीन बरडे यांनी शहरातील गाळे धारकांचा प्रश्‍न मार्गी लावण्याविषयी सूचना केली होती. त्यावेळी पालकमंत्री म्हणाले की, गाळे धारकांच्या प्रश्‍नाबाबत लवकरच नगरविकास मंत्री शिंदे यांच्यासोबत महापौर, आमदार, आयुक्त, गाळे धारकांची प्रतिनिधी यांच्यासोबत घेवू. त्यात हा प्रश्‍न शंभर टक्के निकाली निघेल. तोपर्यंत आयुक्त गाळे धारकांवर कारवाई करणार नाही.

शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आव्हाणे शिवारात घनकचरा प्रकल्प तयार आहे. मात्र तो विजेच्या संयोजनाअभावी बंद आहे. विज कंपनी विजेचे संयोजन देत नसल्याची तक्रार आमदार भोळे यांनी केली. यावर पालकमंत्री, खासदारांनी विज कंपनी व महापालिकेची बाजू ऐकून विज कंपनीने ज्याच्याकडे थकबाकी आहे. (पूर्वीची विल्हेवाट लावणारी कंपनी) त्यांच्याकडून वसूल करावी घनकचरा प्रकल्पाला विज देण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

Protected Content