राष्ट्रवादीच्या सावदा शहराध्यक्षपदी एकलव्य कोल्हे

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील एकलव्य कोल्हे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या सावदा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र प्रल्हादराव पाटील यांच्या हस्ते एकलव्य कोल्हे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मुक्ताईनगर विधानसभा अंतर्गत सावदा शहरी अत्यंत महत्त्वाचे असून आमदार ठरवणारे शहर म्हणून सावदा शहराकडे पाहिले जाते म्हणून आ. एकनाथराव खडसे यांचे हात बळकट करण्यासाठी एकलव्य कोल्हे यांनी सार्थ विश्वास दाखवत पुढील काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

एकलव्य कोल्हे यांच्या नियुक्तीवर माननीय एकनाथराव खडसे व महिला प्रदेशअध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच सावदा शहरातील समाजसेवक पंकज येवले, जगदीश बढे, सय्यद अजगर, अतुल नेहेते, मुराद तडवी व इतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सावदा शहर कार्यकर्ते यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, दिनांक १८ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मुक्ताईनगर निवासी अभ्यास वर्ग शिबिरात माजी आमदार अरुण पाटील राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा ऍड. रोहिणी ताई खडसे खेवलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, विनोद तराळ, सावदा माजी नागराध्यक्षा अनिता येवले, यू. डी. पाटील, सोपान पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस मुक्ताईनगर मतदार संघातील पदाधिकार्‍यांनी सावदा शहर अध्यक्ष एकलव्य कोल्हे यांचे अभिनंद केले.

Protected Content