विद्यापीठात पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्री-पीएच.डी. कार्यशाळेचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी.(पेट-२०१९) च्या विद्यार्थ्यांसाठी १ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन प्री-पीएच.डी. कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

१ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ९ ते सायं.५.३० या वेळेत ही ऑनलाईन कार्यशाळा होईल. विद्यार्थ्यांना कार्यशाळेत सहभागी होण्याच्या सूचना त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील.  कार्यशाळेच्या कालावधीत ऑनलाईन पूर्ण् वेळ उपस्थिती अनिवार्य आहे. लॉगीन मध्ये आलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क, कार्यशाळा शुल्क व कार्यशाळा परीक्षा शुल्क वेळेत भरणे आवश्यक आहे.  १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीसाठी इंग्रजी व मराठी माध्यम असे दोन गट करण्यात आले आहेत.  तर ५ फेब्रुवारीला ११ गट करण्यात आले आहेत.  ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीसाठी एक गट करण्यात आला असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर गटाबाबतचा तपशील देण्यात आला आहे अशी माहिती संशोधन विभागाचे सहायक कुलसचिव व्ही.व्ही.तळेले यांनी दिली आहे.

Protected Content