धाडसी दरोडा टाकून लुटारूंनी ‘हेल्मेट, मोबाईलसह डीव्हीआर’ फेकले नाल्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एसबीआय बँकेत सशस्त्र दरोडा टाकून बँक मॅनेजरला गंभीर जखमी करून ३ कोटी ७७ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कालिंका माता मंदीर परिसरात घडली होती. शनीपेठ पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दरोडेखोर हे अयोध्यानगर मार्गे जात असतांना हेल्मेट, ५ मोबाईल आणि डीव्हिआर एका नाल्याचे फेकून देवून पसार झाल्याचे निष्पन्न झाले असून दुचाकीवरून जात असतांना दोन्ही दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

 

जळगाव शहरातील कालिंका माती परिसरातील एसबीआय बँकेच्या शाखेत गुरूवार १ जून रोजी सकाळी ९ वाजता दोन दरोडेखोरांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बांधून व तोंडाला पट्टी लावून बँक मॅनेजर राहूल मधुकर महाजन यांच्या मांडींवर वार करून जखमी केले. त्यानंतर तिजोरीत ठेवलेले ३ कोटी ६० लाख रूपयांचे सोने आणि १७ लाख रूपयांची रोकड असा एकुण ३ कोटी ७७ लाख रूपयांचा मुद्देमाल पोबारा केला होता. विशेष म्हणजे सीसीटीव्हीचा डीव्हिआर आणि कर्मचाऱ्यांचा मोबाईल घेवून दरोडेखोर बँक व्यवस्थापकांच्याच दुचाकी घेवून पसार झाले होते. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात बँक मॅनेजर राहूल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चोरट्यांनी अयोध्यानगर परिसरातील नाल्यामध्ये बँकेचा डिव्हीआर, हेल्मेट आणि पाच मोबाईल फेकून देवून मुद्देमाल घेवून पसार झाले. काशिनाथ लॉज परिसरातील एक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीवरून जात असतांना दोन्ही दरोडेखोर कैद झाले आहे. त्यानुसार पोलीस कर्मचारी दरोडेखोरांचा शोध घेत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके करीत आहे.

Protected Content