पहूर येथे रक्तदान शिबीरात ५१ जणांनी केले रक्तदान

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कै. कृषी पंडित मोहनलाल  लोढा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

 

रक्तदाब शिबिराचे उद्घाटन माजी जि.प. संजय गरुड, जि.प.सदस्या प्रमिलाबाई राघो पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव व कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  श्री हॉस्पिटल कृषी पंडित मोहनलाल लोढा कॉम्प्लेक्स पहूर या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

 

सदर रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.  यावेळी डी. के. पाटील,कैलास पाटील, किशोर कोचेटा, प्रल्हाद वानखेडे, सागरमल जैन, प्रदीप लोढा, डाॅ. मनोहर पाटील, संजय गरूड आदिंनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी बाबुराव पांढरे, भास्कर पाटील,शाम सावळे, दीपक लोढा,पंकज लोढा, राजु किसन पाटील,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन शैलेश पाटील यांनी तर आभार शाम सावळे यांनी मानले.रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्था शाखा पहूर व पाळधीच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content