Home क्राईम मुखर्जी उद्यानाजवळ दोन दुकाने फोडली

मुखर्जी उद्यानाजवळ दोन दुकाने फोडली

0
24

जळगाव प्रतिनिधी । शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळच्या व्यापारी संकुलात चोरट्यांनी दोन दुकाने फोडल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.

शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुल आहे. व्यापारी संकुलात रविंद्र सुकलाल वाणी यांचे दु.क्र.२९ विजय पान मंदिर दुकान आहे तर जवळच मुतारी बाहेर रमेश सपकाळे यांची जय बजरंग नावाने पान टपरी आहे. मंगळवारी रात्री ७ वाजता दोघे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले.

रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत दोन्ही दुकानांचे कुलूप तोडून संधी साधली. चोरट्यांनी रविंद्र वाणी यांच्या दुकानातून ७०० रुपयांची सिगारेटचे पाकीट, २०० रुपयांची चिल्लर आणि टेबल फॅन असा २५०० चा ऐवज लंपास केला. रमेश सपकाळे यांच्या दुकानातून चॉकलेटची बरणी आणि चिल्लर असा ऐवज लंपास केला.आज सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असून यापूर्वी देखील अनेक वेळा याठिकाणी चोऱ्या झाल्या असून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.


Protected Content

Play sound