पथराळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पथराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

 

यावल तालुक्यातील पथराळे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाच्यावतीने समग्र शिक्षा अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश संचांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच योगिताताई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रतापराव पंडित सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिनकर धिवर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश धिवर, उपाध्यक्ष अजय सोनवणे , शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ज्ञ सदस्य अविनाश धिवर ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्या रंजना सोनवणे, नंदा धिवर, आशासेविका मायाबाई धिवर, शालेय स्वयंपाकी प्रमिलाबाई माळे, गुलाब धिवर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक, गावकरी तसेच शाळेचे मुख्याध्यापक भुषण कुमावत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे चेहरे नवीन गणवेश मिळाल्याने आंनदाने उजळून गेले होते. व पालकांनीही आनंद व्यक्त केला .

Protected Content