अबू आझमीला महाराष्ट्राच्या बाहेर फेका : संभाजीराजे छत्रपती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । ‘औरंगजेब हा वाईट राजा नव्हता…औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही’ असं अबू आझमींनी म्हटलं आहे. या विधानावरून आता संभाजीराजे छत्रपतींनी टीका केली आहे.

 

आझमींच्या या विधानावरून आता संभाजीराजे छत्रपतींनी लोणावळ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना टीका केली आहे.

”अबू आझमी महाराष्ट्रात का राहतोय, असल्या माणसला पहिलं महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे, असं बोलायची याची हिंमत कशी काय होते? शिवाजी महाराजांनी मुघलशाहीला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून बाहेर काढण्याच ठरवलं होतं आणि हे असे माणसं महाराष्ट्रात राहतात हे दुर्दैव आहे. महाराष्ष्ट्रातील नागरिकांनी त्यांना(अबू आझमीला) सांगायला हवं की तुला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू, फुले आंबेडकरांचं आणि सगळ्या संतांचं नाव घ्यायला पाहिजे, काय त्या औरंगजेबच नाव घेतोय” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.

 

औरंगाबादमध्ये अनेक लोकांचं नाव औरंगजेब असून रावसाहेब दानवे यांचा दावा खोटा असल्याचंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, “औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही.”

Protected Content