याकूब मेमनचे उदात्तीकरण कशासाठी ? : बावनकुळेंचा ठाकरेंना प्रश्‍न

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई बॉंब स्फोटातील फाशी देण्यात आलेला आरोपी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकुब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता. त्याच्या कबरीवर एलईडी लायटिंग, संगमरवरच्या फरशा लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली यामुळे अखेर आज मुंबई पोलिसांनी कारवाई करुन याकूब मेमनच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्लच्या काढून टाकल्या आहेत. तर, यावरून आता भाजपने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित करणारी ही घटना आहे. सुशोभिकरणासाठी मदत करणार्‍या सर्व जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी कुठली पातळी गाठली? असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंवर टीका केली. बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड का केली? उत्तर द्या, हे मविआच्या सरकारचं पाप, या सरकारला जबाबदार धरू शकत नाही, आधीच्या गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष का केलं? असे प्रश्नही बावनकुळेंनी विचारले आहेत.

Protected Content