उद्या विधानसभेत बहुमत चाचणी;  बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्राचे दोन हजार जवान

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे मुक्कामास असलेले शिवसेनेचे आमदार बंडखोर आमदार उद्या गोवा आणि तिथून मुंबईत येणार आहे. सुरक्षेसाठी केंद्राचे दोन हजार जवान मुंबईत तैनात करण्यात आले आहेत.

उद्या विधानसभेत बहुमत चाचणी होणार असून त्यासाठी बंडखोर आमदार मुंबईला येणार आहेत. शिवसेना बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक असल्याने केंद्र सरकारने सीआरपीएफच्या तब्बल दोन हजार जवानांची सुरक्षा त्यांना दिली आहे.

उद्या गुरुवार, दि. ३० जून रोजी राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावलं असून त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटातील जवळपास ५० आमदार हे गुवाहाटीवरुन आज गोव्याला पोहोचणार आहेत. त्यानंतर उद्या हे सर्व आमदार मुंबईत पोहोचणार आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी अनेक आमदारांच्या कार्यालयांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. या बंडखोर आमदारांना विमानतळापासून ते विधानसभेपर्यंत नेण्याची जबाबदारी ही या जवानांवर आहे.

 

Protected Content