Home प्रशासन तहसील रावेरच्या तहसीलदारांची बदली : बंडू कापसे यांची नियुक्ती

रावेरच्या तहसीलदारांची बदली : बंडू कापसे यांची नियुक्ती

0
182


रावेर/सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी बंडू कापसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रावेर तालुक्याच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची बदली होणार असल्याची कधीपासून चर्चा सुरू होती. त्यांनी या आधीच या संदर्भात विनंती केलेली होती. तथापि, मध्यंतरी बदल्या रखडल्याने ही प्रक्रिया झाली नाही. या पार्श्‍वभूमिवर, आर्थिक वर्ष संपल्यानंतर देवगुणे यांची बदली करण्यात आलेली आहे. या संदर्भात राज्य शासनाचे सहसचिव माधव वीर यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहेत.

दरम्यान, उषाराणी देवगुणे यांची नेमकी कुठे बदली झाले हे या आदेशात नमूद केलेले नसले तरी त्यांच्या जागी नाशिक जिल्ह्यातल्या कळवण येथून बंडू कापसे हे रावेरच्या तहसीलदारपदी रूजू होणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ते आजच आपल्या पदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound