सावद्यातील बंद घर चोरट्यांनी केले टार्गेट; दागिन्यांसह रोकड लांबविली

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सोमेश्वर नगरातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचे बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करत बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून १ लाख १० हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील सोमेश्वर नगरात बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचपारी देविदास गंभीर तायडे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. देवीदास तायडे यांनी नुकतेच नवीन घर बांधले होते. त्यामुळे घरातील सामान शिप्टींचे काम सुरू होते. दरम्यान, बंद घर असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील सोन्याची मंगलपोत आणि ५० हजारांची रोकड असा एकुण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले. दरम्यान, देविदास तायडे यांचा मुलगा हा ३० मार्च रोजी सकाळी ९ वाजता घरी आला त्यावेळभ्‍ घराचे कुलूप तोडलेले दिसून आले. चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्तव्यस्त दिसून आला. यासंदर्भात सावदा पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. याप्रकरणी सावदा पोलीस ठज्ञण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या भागामध्ये नगरपालिकेने पथदिव्यांचे तार बसवून किमान ४ महिने झाले असतील, मात्र आतापर्यंत पथदिवे लावण्यात नगरपालिकेला यश आले नाही. या भागांमध्ये रात्रीला संपूर्णपणे अंधार असतो. या गल्लीमध्ये कोण फिरत आहे, कोण जात आहे, काहीही दिसायला समजत नाही. चोरट्यांनी नेमक्या अंधाराचा फायदा घेऊन चोरी करत आहे. नगरपालिकेने भविष्यात होणाऱ्या चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी लवकरात लवकर पथदिवे लावून नागरिकांची सुरक्षा करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे

Protected Content