कामागाराची दुचाकी चौकातून लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ज्ञानदेव नगरातील चौकातून दुकानदारावर काम करणाऱ्या व्यक्तीची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून येण्याचे समोर आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर प्रभाकर चौधरी (वय-४२) रा. योगेश्वर नगर, जुनाखेडीरोड, जळगाव हे आपल्या कुटुंबीय वास्तव्याला असून ते ज्ञानदेव नगर चौकातील एका दुकानात मुनीमजी म्हणून कामाला आहे. ४ ऑक्टोंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची मालकीची दुचाकी (एमएच १९ एव्ही ४६३३) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्याने १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची उघडकीला आले. सहा दिवस दुचाकीचा शोध घेतल्यावरही दुचाकी न मिळून आल्याने सोमवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता किशोर चौधरी यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज देऊळकर करीत आहे.

Protected Content