मोदींचा काँग्रेसवर अधिवेशनात अडथळ्यांचा आरोप

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  अधिवेशनात अडथळा आणत असल्याने पंतप्रधान मोदींनी भाजपाच्या संसदीय बैठकीत काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला.

 

काँग्रेस पक्षाला ना चर्चेत रस आहे, ना संसदेचं कामकाज चालू देत आहेत अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर भाजपा नेते या बैठकीला उपस्थित होते. भाजपाच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेस सभागृहाचं कामकाज चालू देत नाही, तसंच लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही हजर राहत नाही,” असं मोदी यावेळी म्हणाले.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा खासदारांना १५ ऑगस्टनंतर आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांसमोर सत्य परिस्थिती मांडण्याचं आवाहन केलं आहे.

 

 

फोन टॅपिंग, कृषी कायदे मुद्द्यावरुन विरोधकांनी सोमवारी राज्यसभेत गदारोळ घातला. विरोधकांकडून वारंवार सभागृहाचं कामकाज बंद पाडलं जात आहे. सोमवारी पाच वेळा सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं होतं.

 

Protected Content