दुकानदारांना ब्लॅकमिलिंग करून वसुली कराल तर कारवाई करू : आ. सावकारे

भुसावळ, प्रतिनिधी । शहरात कोरोनाच्या नावाखाली नगरपरिषदे कर्मचारी दुकानदारांना ब्लॅकमिलिंग करून वसुली करीत असल्याचे तक्रारी आमदार संजय सावकारे यांच्याकडे आल्या आहेत. हा प्रकार जर थांबविला नाही तर कारवाई केली जाणार असा इशारा आज प्रांत कार्यालयाच्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये आमदार सावकारे यांनी दिला.

उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आज रोजी १२:०० वाजेला सर्व पक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कोरोना बाधित रुग्ण हे कटेन्मेंट झोनच्या बाहेर फिरत आहे. सध्या मलेरिया,सर्दी, खोकला यासारखे आजार उदभवित आहे.खाजगी डॉक्टर उपचार करण्यास टाळाटाळ करीत आहे असे अनेक तक्रारी प्रशासनाकडे आलेल्यावर चर्चा करून मार्ग काढण्यात आले. रस्त्यावर बाजार विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. कनेन्मेंट झोनमध्ये असलेल्या बँकेमध्ये पेंशन घेणाऱ्यांची हाल होत आहे. आशा वर्कर मार्फत शहरातील नागरिकांना कोरोनाबद्दल माहिती पुरविण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण आढळून आला त्या रुग्णांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावा. रुग्णाने न ऐकल्यास गुन्ह दाखल करावे. शहरामध्ये पोलीस अधिकारी व एस.आर.पी.एफ.चे कर्मचारी फिरतांना दिसत नसल्याच्या आरोपी आमदारांनी बैठकीत केला. शहरात जनता कोणालाच घाबरत नाही फक्त खाकीला घाबरते यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावा व बिना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करा. शहरातील संशयित रुग्णांचे दिवसभरातून ५०० स्वॅब घेतले जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिली. बैठकीमध्ये नगरसेवकांना येणाऱ्या अडीअडचणी एकूण घेतल्या व सूचनाही दिल्या.

Protected Content