मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यास सशर्त परवानगी !

जळगाव (प्रतिनिधी) राज्याला कोरोनाचा विळखा असताना लग्न समारंभासाठी ५० जणांच्या उपस्थितीची परवानगी याआधीच देण्यात आली आहे. मात्र आता लग्न समारंभाचे आयोजन मंगल कार्यालयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आज सशर्त परवानगी दिली आहे.

 

पावसाला सुरु झाल्यामुळे ५० जणांच्या उपस्थितीत लग्न करण्याची मुभा प्रशासनाकडून मिळाली असली तरी, मंगल कार्यालय बंद असल्याने लग्नसोहळा कसा पार पाडायचा? याबाबत संभ्रम कायम होता. त्यामुळे नागरिकांनी प्रशासानाकडे मंगल कार्यालय खुली करण्याची मागणी करण्यात आली होते. काही नियमांच्या अटी घालत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगल कार्यालयात लग्न समारंभ करण्याची परवानगी दिली आहे. लाॅन, वातानुकूलित मंगल कार्यालय, सभागृह किंवा घराच्या परिसरात सुरक्षित अंतर पाळून लग्न सोहळा करण्याची मुभा देण्यात आली असली तरी लग्नासाठी रीतसर परवानगी मात्र घ्यावी लागणार आहे. कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे पालन करणेही बंधनकारक असणार आहे.

Protected Content