‘फेसबूक लाइव्ह’वर आता बंधने

Facebook live

 

सन फ्रान्सिस्को (वृत्तसंस्था) ख्राईस्टचर्चवरच्या हल्ल्याचे ‘फेसबुक लाइव्ह’ झाल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आता आता फेसबूकने थेट प्रक्षेपणावर बंधने घातली आहेत.

 

फेसबूक गुन्हे शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सॅन्डबर्ग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ख्राईस्टचर्चवरच्या हल्ल्यानंतर काही निकषांवर आधारित फेसबूकवर थेट कोण जाऊ शकेल यावर बंधने घालण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे. याबाबत फेसबुककडून निरीक्षण केले जाणार आहे. तसेच समाजात द्वेश पसवणाऱ्या मजकुराला लगाम घालण्यासाठी वादग्रस्त मजकुरावरही बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content